सोनू निगमला झाली अ‍ॅलर्जी; रूग्णालयात उपचार सुरु

सी फूड खाण्याचे निमित्त झाले आणि सोनू निगमला गंभीर अ‍ॅलर्जी झाली. यामुळे त्याचा एक डोळा सुजला. यानंतर लगेच त्याला आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. सोनूसध्या रूग्णालयात उपचार घेत आहे.

सोनूने स्वत: इन्स्टाग्रामवर आपले दोन फोटो शेअर करत, याची माहिती दिली आहे. सी फूड खाल्ल्यामुळे माझ्यावर ही वेळ आली. रूग्णालयात पोहोचायला आणखी उशीर झाला असता तर गंभीर स्थिती ओढवली असती. माझ्या श्वसननलिकेला सूज आली असती आणि मी श्वास घेऊ शकलो नसतो, असे सोनूने म्हटले आहे. अ‍ॅलर्जीकडे कधीही दुर्लक्ष करू नका, असा सल्लाही त्याने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like