प्रदर्शनाच्या काही दिवसं पूर्वीच ‘सोनचिडिया’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

‘सोनचिडिया’ हा चित्रपट १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला असून चित्रपट निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे.

या चित्रपटातून चंबळची प्रतिमा मलीन करण्यात येत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे.या चित्रपटामध्ये सुशांत सिंह राजपूत,भूमी पेडणेकर, अशुतोष राणा, मनोज वाजपेयी आणि रणवीर शौरी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

या चित्रपटाची कथा १९७५ साली लागू करण्यात आलेल्या आणीबाणीवर आधारित असून आणीबाणीनंतर चंबळमधील दरोडेखोऱ्याचं आयुष्य पूर्णपणे बदलतं. यावर या चित्रपटात भाष्य करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like