सोनमने शेअर केले ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’चे मोठे ‘सिक्रेट’

‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट उद्या म्हणजेच १ फेब्रुवारीला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. सोनम कपूर आणि अनिल कपूर या चित्रपटात प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि तेव्हापासून चित्रपटाच्या कथेबद्दलचा सस्पेन्स वाढला.
पण रिलीजच्या अगदी तोंडावर हा सस्पेन्सही संपलाय. या चित्रपटाचे एक नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आणि हा चित्रपट समलैंगिक नात्यावर आधारित असल्याचे स्पष्ट झाले.
पहिल्यांदाच सोनम पडद्यावर हिरोसोबत नाही तर हिरोईनसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. ट्रेलरमध्ये या मुलीची एक झलक दिसली होती. पण ही हिरोईन कोण, हे गुलदस्त्यात होते. तर आता तिच्या नावाचा खुलासाही झाला आहे. या हिरोईनचे नाव आहे रेजीना कंसाड्रा.
महत्वाच्या बातम्या –
- टीव्ही अभिनेता राहुल दीक्षितची गळफास घेऊन आत्महत्या
- एकता कपूर झाली आई; दिला मुलाला जन्म
- ‘हा’ दाक्षिणात्य अभिनेता झळकणार कपिल देवच्या बायोपिकमध्ये
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकची शूटिंग सुरू