सोनमने केले क्वारंटाईनच्या नियमांचे उल्लंघन?

सोनम कपूर दिल्ली आणि मुंबईमध्ये वास्तव्य करून पुन्हा लंडनला गेली आहे. लॉकडाऊनपूर्वी सोनम आणि तिचा पती आनंद आहूजा भारतात आले आणि पुन्हा लंडनला गेले. दरम्यान, सोनम कपूरने तिच्या वर्कआऊट सेशननंतरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सोनम पार्कमध्ये बसलेली दिसून येत आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही चाहत्यांना आनंद झाला, तर काही जणांनी सोनमवर आरोप लावण्यास सुरवात केली आहे.एका ट्विटर युजरने लिहिले की, बघा एक भारतीय अभिनेत्री लंडनमध्ये क्वारंटाईनचे नियम मोडत लोकांचे जीवन धोक्यात आणत आहेत. तर अन्य एका युजरने लिहिले, लंडनमध्ये भारतीय अभिनेत्री सोनम कपूर आणि मौनी रॉय 14 दिवसांच्या होम क्वारंटाईन कायद्याचा भंग करत लोकांचे जीवन धोक्यात आणत आहेत आणि सोशल मीडियावर हे शेअर करून वाईट उदाहरणे देत आहेत.
याला प्रत्युत्तर देत सोनम म्हणाली, मी माझ्या इमारतीत असलेल्या बागेत आहे. मी पूर्णपणे क्वारंटाईन नियमांचे पालन करत आहे. सध्या लोकांकडे उचापती करण्यासाठी बराच वेळ आहे. त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. तसेच सोनम कपूरला समर्थन दिलाबद्दल तिने यूजर्सचे आभार मानले आहेत.