सोनम कपूरने स्वीकारले ‘साडी चॅलेंज’

सोशल मीडियावर विविध चॅलेंज व्हायरल होत असतात. ‘बॉटल कॅप’ चॅलेंज नंतर सध्या सोशल मीडियावर ‘साडी चॅलेंज’ची क्रेझ आहे. सोनम कपूर कायमच फॅशन ट्रेंड फॉलो करते. इंस्टाग्राम आणि ट्विटरवर विविध विषयांवर ती बिनधास्त व्यक्त होते.आताही साडी चॅलेंजने तिने सगळ्यांना आश्चर्यचकित केले आहे.
या चॅलेंजमध्ये साडी नेसून आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायचा आहे. सोनमने हे चॅलेंज वेगळ्या पद्धतीने केले आहे. तिने तिच्या लहानपणीचा एक फोटो सुद्धा शेअर केला आहे. या फोटोतही तिने साडी नेसली आहे. लहानपणीच्या फोटोसोबतच तिने एक लग्नानंतरचाही एक फोटो शेअर केला आहे.
#SareeTwitter before and after ???? pic.twitter.com/sBOsXL9NuT
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) July 17, 2019