म्हातारपणी अशी दिसेल सोनाली कुलकर्णी

सध्या सोशल नेटवर्किंगवर सगळ्यात चर्चेचा विषय आहे तो आपण म्हातारपणी कसे दिसू यासंदर्भातील फोटोंचा. मुळात हा ट्रेण्ड अचानक व्हायरल होण्यामागील कारण आहे फेसअॅप. या फेस अॅपद्वारे सोनम कपूर, दीप-वीर, अर्जुन कपूर अशा अनेक बॉलिवूड कलाकरांनी फेसअॅप वापरुन ते म्हातारपणी कसे दिसणार याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सोनाली कुलकर्णीने ती ८० वर्षांची झाल्यावर कशी दिसणार याचा फोटो शेअर केला आहे. सोनालीने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोनालीने फेसअॅप वापरुन ती म्हातारपणी कशी दिसणार याचा फोटो शेअर केला. सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.