‘फेअर अँड लव्हली’मधून ‘फेअर’ शब्द वगळणार; सोनालीने व्यक्त केला आनंद

‘फेअर अँड लव्हली’मधून फेअर हा शब्द वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेअर अँड लव्हलीची निर्मिती करणाऱ्या हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीने नावात बदल करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. या निर्णयाचं सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे. अनेक सेलिब्रिटी या निर्णयवर आता व्यक्त होताना पाहायला मिळतायत.

सोनाली कुलकर्णी एक व्हिडीओ पोस्ट करत आपलं मत मांडते, “आपण आशिया खंडात राहतो, आपण भारतात राहतो. आपल्या मातीशी, आपल्या हवामानाशी नातं सांगणारा आपला रंग, वर्ण आहे. आपणा सर्वांना विदेशी गोरेपणाचं प्रचंड आकर्षण असल्यामुळे गेली अनेक वर्षे आपण आपल्या रंगाला नाकारतो आहे. त्यामुळे असे वेगवेगळे प्रयोग स्वत:ला गोरं करण्यासाठी आपण करत आहोत. पण आता याला आळा बसेल आणि आपण स्वत:ला जसे आहोत तसे स्वीकारू.हिंदुस्थान लिव्हरच्या टीमने खुपच सकारात्मक आणि स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. ”

 

You might also like