‘हा’ व्हिडीओ बघून सोनाली कुलकर्णी झाली भावूक

सालाबादाप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी साजरी होत आहे. पण, दरवर्षीसारखा आनंद यंदा नाही. चंद्रभागेचा काठ अगदी निपचित पडला आहे. विठ्ठल मंदिर परिसरही सुनासुना आहे.  तरीही काही वारकरी लाडक्या विठ्ठलाच्या भेटीसाठी जाताना दिसले. पंढरपूरच्या वेशीवर जाऊन पोहोचलेल्या एका वारकऱ्याला पोलिसाने अडवले. त्यानंतर वारकऱ्यानं त्याच्यामध्येच विठ्ठल बघत, हात जोडले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. हा व्हिडीओ बघून अभिनेत्री कुलकर्णी यांच्याही डोळ्यात पाणी आलं.

हे दृश्य बघून सोनालीला रडू आलं. व्हिडीओ बघून सोनालीने आपल्या भावना व्यक्त केल्या.  “मला रडूच आलं हा व्हिडीओ बघून… हा निर्मळपणा, भवतालाचा स्विकार, भक्तीतली शक्ती आणि ओतप्रोत भरलेली माया माऊली.. तुम्हाला साष्टांग प्रणिपात,” अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना इंस्टाग्रामवर पोस्ट करून व्यक्त केल्या.

You might also like