सोनाली बेंद्रे कॅन्सरला हरवून कामावर परतली !

गत वर्षी सोनाली बेंद्रेला कॅन्सरचे निदान झाले. कॅन्सरच्या निदानानंतर सोनाली उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाली. आता अखेर सोनाली पूर्णपणे स्वस्थ होऊन भारतात परतली. आता तर ती कामावरही परतली आहे. सोनालीने स्वत: ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत तिने ही माहिती दिली. सकारात्मकता, संयम आणि पराकोटीचे धैर्य या जोरावर सोनालीने कॅन्सरला परतवून लावले. आता तिच्या नव्या प्रोजेक्टची चाहत्यांना प्रतीक्षा असणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

You might also like