…..म्हणून अनुपम खेर यांच्या डोळ्यांत आले अश्रू

सुशांतचा ‘दिल बेचारा’ हा अखेरचा चित्रपट २४ जुलैlला प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक जण सुशांतच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान अअनुपम खेर यांनी देखील ‘दिल बेचारा’ चित्रपटावर प्रतिक्रिया दिली. आम्हाला तुझी कायम आठवण येईल, असं म्हणत त्यांनी दु:ख व्यक्त केलं.“प्रिय सुशांत सिंह राजपुत, दिल बेचारा हा चित्रपट प्रदर्शित झाला. भौतिक जगात तू आमच्यासोबत नाहीस याचं कायम दु:ख राहिल. तुझा हा चित्रपट आम्ही मनापासून पाहू. हा चित्रपट पाहून आमच्या डोळ्यांतून अश्रू वाहतील. आम्हाला तुझी कायम आठवण येईल.” अशा आशयाचं ट्विट करुन अनुपम खेर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘दिल बेचारा’ हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात सुशांतसोबत नवोदित अभिनेत्री संजना सांघीने स्क्रीन शेअर केली असून तिचा अभिनयदेखील प्रेक्षकांना भावला आहे. १ तास ४१ मिनीटांच्या या चित्रपटाला जगातील सर्वात मोठी रेटिंग ऑथिरिटी आयएमडीबीनेदेखील १० पैकी १० रेटिंग दिलं आहे.

You might also like