…म्हणून तडकाफडकी ‘डॉक्टर डॉन’ मालिकेचा सेट दुस-या ठिकाणी हलवला

सद्या जगभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे, त्यानंतर सुरु झालेल्या लॉकडाउनमुळे जवळपास तीन महिने मालिकांचं शूटिंग बंद होतं. मात्र आता काही अटीशर्तींचे पालन करत शूटिंगला सुरुवात झाली आहे. १३ जुलै पासून या मालिकेचे नवीन भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. पण ‘झी युवा’वरील ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेने आपला सेट या महापलिकतेला देण्याचा निर्णय घेतला.

पडद्यावरील डॉक्टर डॉन आता खऱ्या आयुष्यात कोविड योद्ध्यांच्या मदतीसाठी सज्ज झाला आहे. ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या सेटमध्ये, हॉस्पिटलच्या सेटचा समावेश आहे. पण आता मालिकेत पाहायला मिळत असलेलं हे हॉस्पिटल, यापुढे कोविड सेंटर म्हणून वापरले जाणार आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यावरील उपाय म्हणून अनेक कोविड सेंटर्सची निर्मिती केली जात आहे.

महापालिकेला कोविड सेंटरसाठी जागेची आवश्यकता होती. हॉस्पिटलचा सेट उभारलेला असल्याने, ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेच्या टीमकडे जागेविषयी मागणी करण्यात आली. त्यानंतर मालिकेच्या टीमने सुद्धा कोविड योद्ध्यांना मदत करण्याची ही संधी सोडली नाही. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपलाही खारीचा वाटा असावा, यासाठी मालिकेचा सेट आता महापालिकेच्या ताब्यात देण्यात आला आहे.

देवदत्त नागे, श्वेता शिंदे आणि रोहिणी हट्टंगडी अशा दिग्गज कलाकारांचे, ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन झाले. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. सध्या या मालिकेचं चित्रीकरण कर्जत येथे एका रिसॉर्टमध्ये होतंय. मालिकेच्या सेटचा वापर एका अत्यंत महत्त्वपूर्ण कामासाठी होणार असल्याने, टीममधील प्रत्येकच कलाकार खूप खुश आहे.

You might also like