…..म्हणून सारा अली खान आईसोबत पोहचली देहरादुनच्या पोलीस ठाण्यात

अमृता सिंह आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सारा अली खान आणि अमृता सिंह देहरादून पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. देहरादूनमध्ये साराच्या मामाची करोडोंची जमीन आहे. या जमिनीवर भू-माफियांची करडी नजर आहे. या कारणामुळे सारा आणि तिच्या आईला भीती देखील आहे की, ही जमिन भू माफिया हडप करू शकतात. गेल्या शनिवारी मामा मधूसुदन बिम्बेट यांचे कँसर आजारामुळे निधन झाले.

अंतिम संस्कार होताच दोघेही सरळ देहरादुन येथील पोलिस स्टेशन गाठले. या प्रॉपर्टीवर माझाही हक्क असल्याचा दावा अमृता सिंहने केला आहे. तसेच पोलिसांनी या बंगल्यात कोणीही जाऊ नये म्हणून बंगला सील केला होता. तब्बल 16000 स्के.फिटचा हा बंगला आहे. जोपर्यंत त्यांच्या कुटुंबियांपैकी येथे कोणीही येत नाही तोपर्यंत पोलिसांनीच या करोंडोच्या प्रॉपर्टीची काळजी घ्यावी असे अमृताने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

 

 

You might also like