……म्हणून रेखा यांनी कोरोना चाचणीसाठी दिला नकार

रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला करोनाची लागण होताच त्यांचा बंगला सील करण्यात आला आहे. मुंबईतल्या वांद्रेमधली बँडस्टँड परिसरात त्यांचा बंगला आहे. मुंबई महापालिकेने बंगल्याचा परिसर सॅनिटाइज करून प्रतिबंधित क्षेत्र असल्याचं फलक तिथे लावलंय.

‘असल तो सिद्दी तर आम्हीबी हाय जिद्दी’; पाहा, अंगावर काटा आणणारा ‘जंगजौहर’चा टीझर

त्याचसोबत सुरक्षारक्षकाच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. परंतु रेखा यांनी करोना चाचणी करण्यास नकार दिल्याचं समजतंय. इतकंच नाही तर रेखा यांचा बंगला सॅनिटाइज करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी गेले असता दरवाजा उघडण्यात आला नाही. अखेर कर्मचारी बंगल्याच्या बाहेर व आजूबाजूचा परिसर सॅनिटाइज करून परतले.

रेखा, त्यांचा मॅनेजर फरझाना आणि इतर तीन कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीसाठी पालिकेचे कर्मचारी बंगल्यावर पोहोचले होते. मात्र बंगल्याचा दरवाजाच कोणी उघडला नाही. थोड्या वेळानंतर फरझाना यांनी दार न उघडताच आतून आवाज दिला आणि बंगल्याच्या फोनवर कॉल करून बोलण्यास सांगितलं.

लॉकडाऊनमुळे सलमान खानवर आली शेतात राबायची वेळ

काही वेळानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी फरझाना यांना फोन केला असता रेखा यांची तब्येत बरी असून त्या कोणाच्याही संपर्कात आलेल्या नाहीत असं सांगण्यात आलं. त्यामुळे रेखा यांना करोना चाचणी करून घ्यायची नाही, असंही ते म्हणाले.

 

You might also like