….तर मी ‘पद्मश्री पुरस्कार’ परत करणार

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगना रणौतने बॉलिवूडमधील दिग्गज चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांवर निशाणा साधला होता. तसेच सुशांतने बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केल्याचे तिने म्हटले होते. आता पुन्हा एकदा कंगना तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. यावेळी तिने केलेले आरोप सिद्ध करुन दाखवले नाहीत तर पद्मश्री हा पुरस्कार ती परत करण्याचे खळबजनक विधान कंगनाने केले आहे.

बॉलीवूडमध्ये स्वबळावर नाव कमावणाऱ्या कलाकारांना यशापासून दूर ठेवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये षडयंत्र रचले जाते, तसेच बॉलीवूडमधील कंपूशाहीने  सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याची आगपाखड कंगनाने केली आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ कंगनाने इंस्टाग्रामवर पोस्ट करत बॉलिवूडमधील कंपूशाहीवर निशाणा साधला होता.

 

एका मुलाखतीमध्ये तिने ‘मुंबई पोलिसांनी मला बोलवले होतो. पण मी मनालीमध्ये असल्यामुळे कोणाला तरी माझा जबाब रेकॉर्ड करण्यासाठी पाठव अशी मी त्यांचाकडे मागणी केली. पण माझ्या विनंतीनंतर मला मुंबई पोलिसांकडून काहीच उत्तर मिळाले नाही. मी तुम्हाला सांगते, जर मी असे काही बोलले असेल जे मला सिद्ध करुन दाखवता येणार नाही. तर मी माझा पद्मश्री हा पुरस्कार तुम्हाला परत करेन’ असे कंगना म्हणाली.

 

You might also like