‘या’ कारणामुळे बिग बींना आनंदाश्रू झाले अनावर

महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन त्या पाठोपाठ ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना सुद्धा काही दिवसंपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता तर त्यांना नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मात्र ,आता ऐश्वर्या आणि आराध्या या दोघींचाही कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशी माहिती अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून दिली आहे.

अमिताभ बच्चनने ट्विटर यांनी ट्विट केले आहे की, “आमची चिमुकलीला आणि सुनबाईंना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. माझ्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीयेत. देवा तुझी कृपा आहे”, असं ट्विट बिग बींनी केलं आहे.

दरम्यान, ऐश्वर्या आणि आराध्याची करोना चाचणी निगेटव्हि आली आहे. मात्र अद्यापही बिग बी आणि अभिषेक बच्चनवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बिग बी व अभिषेक यांना ११ जुलै रोजी करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १२ जुलै रोजी ऐश्वर्या व आराध्याचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तेव्हा या दोघींनी घरातच क्वारंटाइन करण्यात आलं होतं. मात्र एका आठवड्यानंतर दोघींनाही नानावटीमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

 

You might also like