‘स्माईल प्लीज’चे ‘अनोळखी’ गाणे प्रदर्शित…..

‘स्माईल प्लीज’ या सिनेमाचे ‘अनोळखी’ हे गाणे नुकतेच  प्रदर्शित करण्यात आले आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच या सिनेमाने रसिकांचे लक्ष वेधण्यास सुरूवात केली आहे. तुर्तास मुक्ता बर्वेवर चित्रित झालेले आणि सुनिधी चौहानने गायलेले हे गाणे  म्हणजे मनातल्या कलहाचे एक समर्पक चित्रण आहे.

आयुष्यात अनपेक्षितपणे येणाऱ्या संकटांवर मात करण्याचा प्रयत्न करत असताना अनेकदा आपण हताश आणि एकटे पडतो. तेव्हा आपण स्वतःशीच अनोळखी होतो आणि चालू होतो स्वतःचा स्वतःशी प्रश्न उत्तरांचा खेळ. या गाण्यातून आलेल्या परिस्थितीवर अगदी समर्पक शब्दांत मनात येणाऱ्या भावना व्यक्त केल्या आहेत. येत्या १९ जुलै रोजी ‘स्माईल प्लीज’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.