रियाच्या अटकेनंतर कलाकारांनी पोस्ट केला खास मजकूर

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी  रिया चक्रवर्तीला अमली पदार्थविरोधी पथकाने  अटक केली आहे. रियाच्या अटकेनंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी तिला पाठिंबा देत सोशल मीडियावर एक खास मजकूर पोस्ट केला.

अटकेपूर्वी चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात जाताना रियाने जो टी-शर्ट परिधान केला होता. त्यावर तोच मजकूर होता. ‘पुरुषप्रधान व्यवस्थेला संपवू’, अशा आशयाचा मजकूर होता आणि रियाच्या अटकेनंतर अनेक मोठ्या कलाकारांनी सोशल मीडियावर तो पोस्ट केला.

रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज फेटाळून न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली. अमली पदार्थ विकत घेणे, त्यासाठी अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा एनसीबीने केला. एनसीबीचे पथक रविवारपासून रियाची चौकशी करत होते. याआधी रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत, अमली पदार्थ विक्रेता झैद विलात्रा, कैझान इब्राहिम, अब्देल बसीत परिहारसह नऊ जणांना एनसीबीने अटक केली आहे.

View this post on Instagram

#JusticeForRhea ☀️

A post shared by Vidya Balan (@balanvidya) on

You might also like