सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत बहिणीने शेअर केला भावनिक व्हिडिओ

सुशांत सिंह राजपूत ने वयाच्या 34 वर्षी जगाचा निरोप घेतला. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याचे कुटुंब आजही या दु:खातून बाहेर पडलेले नाही. सुशांतच्या आठवणीत बहिण श्वेता सिंह कीर्तिने भावाचा एक व्हिडिओ सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये सुशांतची प्रत्येक अॅक्टिव्हिटी पाहायला मिळत आहे. यात सुशांत पुस्तक वाचताना, टेनिस खेळताना तसेच आपल्या प्रिय डॉगीसोबत खेळताना दिसत आहे.श्वेताने या व्हिडिओला ‘सच अ क्यूटी पाई. स्वप्नांनी भरलेल्या डोळ्यांसह जगातील सर्वात चांगला बेबी,’ असं कॅप्शन दिलं आहे.
दरम्यान, श्वेता आपल्या कुटुंबासोबत युएसमध्ये राहत आहे. त्यामुळे सुशांतच्या अंत्यसंस्कारालादेखील तिला येता आलं नव्हतं. श्वेता सिंहने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओला सुशांतच्या चाहत्यांनी लाईक तसेच कमेंन्ट्स केल्या आहेत.