गायिका शिवानी भाटियाचा कार अपघातात मृत्यू

गायिका शिवानी भाटियाचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. अपघातात निखील भाटिया गंभीर जखमी आहे. निखील भाटिया रुग्णालयात दाखल असून प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचं सांगितलं जात आहे.

अपघातानंतर शिवानीला रुग्णालयात आणण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दुसऱ्या वाहनासोबत धडक होऊन हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातात कारचा अक्षरक्ष: चुराडा झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी पती निखील भाटियासोबत नोएडाहून आग्र्याला जात होती. यावेळी यमुना एक्स्प्रेस-वेवर त्यांच्या कारचा अपघात झाला.

महत्वाच्या बातम्या –