सिद्धार्थ मल्होत्राला करायचंय करिना कपूरशी लग्न

करण जोहरच्या  ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरील लावली आहे. सध्या या शोचं ६ वं पर्व सुरु असून या पर्वाच्या नव्या भागाचा एक प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. या भागात सिद्धार्थ मल्होत्रा आणि अदित्य रॉय कपूरने हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे यावेळी त्याने करिना कपूरशी लग्न करण्याची इच्छा असल्याचं म्हटलं आहे.

करणने एका राऊंडमध्ये सिद्धार्थला काही प्रश्न विचारले. त्यात ‘कलाविश्वातील कोणत्या अभिनेत्रीला तुला पत्नीच्या रुपात पाहायला आवडेल ?’ असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर सिद्धार्थने तात्काळ उत्तर देत अभिनेत्री करिना कपूरचं नाव सांगितलं. त्यामुळे सिद्धार्थ करिना कपूरचा चाहता असल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे यानंतर अभिनेता सैफ अली खानला भावाच्या रुपात पाहायला आवडेल असंही सिद्धार्थने सांगितलं.

महत्वाच्या बातम्या –

You might also like