सिद्धार्थने दिली त्याच्या चाहत्यांना एक वाईट बातमी

स्टार प्रवाहवरील त्याच्या जिवलगा या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच सिद्धार्थ चांदेकरच्या सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसिरिजदेखील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली असून ही वेबसिरिज आणि त्यातील सिद्धार्थचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच आवडत आहे.

पण या सगळ्यात सिद्धार्थने एक वाईट बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे. तो काही महिने चाहत्यांपासून दूर जात असल्याचे त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. सिद्धार्थने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले आहे की, सिटी ऑफ ड्रीम्सला माझ्या चाहत्यांनी जो खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. मी काहीतरी नवीन करण्यास सध्या उत्सुक आहे. तुम्हाला मी सगळ्यांना 18 महिन्यांनी भेटणार आहे. तोपर्यंत मला मिस करा… अलविदा.

 

You might also like