श्वेताने का केली कंगनाच्या सुरक्षेची मागणी?

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अनेक नवीन गोष्टींचा उलगडा आता होत आहे. यामध्येच  कंगना रणौतने याप्रकरणी नार्कोटिक विभागाची मदत करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. मात्र त्यासाठी मला संरक्षण मिळावं असं वक्तव्य तिने केलं होतं. तिच्या या वक्तव्यानंतर सुशांतच्या बहिणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंगनाला संरक्षण मिळावं यासाठी विनंती केली आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी माझी एक विनंती आहे. अभिनेत्री कंगना रणौतला संरक्षण देण्यात यावं. तरच ती सुशांत मृत्यूप्रकरणात नार्कोटिक विभागाची मदत करु शकते’, असं ट्विट श्वेताने केलं आहे.

 

 

दरम्यान, अभिनेत्री कंगना रणौत सुशांतप्रकरणी अनेक वक्तव्य करुन चर्चेत येत आहे. यात तिने अलिकडेच कलाविश्वात ड्रग्सविषयी वक्तव्य केलं होतं. तसंच मी सुशांतप्रकरणी नार्कोटिक विभागाची मदत करु शकते, परंतु, मला संरक्षण मिळावं अशी मागणी तिने केली होती. त्यानंतर श्वेताने पंतप्रधान मोदींकडे ही मागणी केली आहे.

You might also like