‘या’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान श्रद्धा कपूर जखमी

रेमो डिसूझा याने ‘एबीसीडी’, ‘एबीसीडी २’नंतर आता त्याचा तिसरा भाग ‘स्ट्रीट डान्सर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये वरुण धवन आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून चित्रपटाच्या सेटवर श्रद्धा कपूर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. डान्स करत असताना श्रद्धाचा पाय मुरगळला असून तिच्या पायाला दुखापत झाली आहे.

दुखापत झाल्याचे काही फोटो श्रद्धाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या चित्रपटाच्या सेटवर श्रद्धा यापूर्वीदेखील जखमी झाली आहे. या चित्रपटामध्ये श्रद्धा आणि वरुणव्यतिरिक्त प्रभुदेवा आणि नोरा फतेही हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाव्यतिरिक्त श्रद्धा ‘साहो’ या चित्रपटातही झळकणार आहे.

You might also like