दीपिका पाठोपाठ श्रद्धा कपूरही एनसीबी कार्यालयात दाखल

दीपिका पदुकोण पाठोपाठ श्रद्धा कपूरदेखील चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोणसोबत श्रद्धा कपूर आणि सारा अली खानचंदेखील नाव समोर आलं आहे. त्यामुळे आज या तिघींची एनसीबी चौकशी करणार आहे. ड्रग्जप्रकरणी श्रद्धा कपूरचं नाव आल्यामुळे बुधवारी तिला एनसीबीने समन्स बजावले होते. त्यानंतर ती चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर झाली आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्जच्या अँगलबाबत एनसीबी तपास करत आहे. रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर या तपासात आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समोर आली. सुशांतच्या लोणावळ्यातील शेतघरी केलेल्या चौकशीत एनसीबी पथकाला श्रद्धाबाबत माहिती मिळाली होती.

दरम्यान, २५ सप्टेंबर रोजी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि दीपिका पदुकोनची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांची एनसीबीने चौकशी केली. यात जवळपास चार तास रकुलची चौकशी करण्यात आली.

You might also like