शोविकला अटक होताच सुशांतच्या बहिणीने केली पोस्ट

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सध्या सीबीआय चौकशी आहे.  दरम्यान, ड्रग्स कनेक्शनशी निगडीत एनसीबीद्वारे मोठी कारवाई केली सुरू आहे. एनसीबीने रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती याच्यासह सॅम्युअल मिरांडाला अटक केली. त्यानंतर सुशांतची बहिण श्वेता सिंहने सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

सुशांत प्रकरणी एनसीबी शुक्रवारी सकाळी तपासासाठी रियाच्या घरी पोहोचली होती. तसंच त्यांची चौकशीही करण्यात आली. त्यानंतर एनसीबीची टीम आपल्यासोबत शोविकला घेऊन गेली होती. याप्रकरणी ड्रग्स कनेक्शनबाबत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोनं शोविक सोबत अटक केलेल्या ड्रग पॅडलर बासित आणि झैद यांचीही चौकशी केली. सर्वांना एकत्र बसवून त्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले.

नुकतात श्वेता सिंहने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने ‘एनसीबी खूप चांगले काम करत आहे… देवाचे आभार’ असे म्हटले असून त्यासोबत हात जोडल्याचे इमोजी वापरले आहेत. तसेच हॅशटॅग वापरत ग्रेट स्टार्ट एनसीसीबी असे म्हटले आहे.

You might also like