‘मिशन मंगल’ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

‘मिशन मंगल’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिका साकरत असून हा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

हा ट्रेलर २ मिनीट ५२ सेकंदाचा आहे. या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नी, सोनाक्षी,शर्मन जोशी हे दिसून येत आहेत. मंगळ मोहिमेची योजना आखण्यापासून ती यशस्वी करण्यापर्यंतचा प्रवास या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आला आहे.

दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टार स्टुडिओ आणि केप ऑफ गुड फिल्म मिळून करणार आहेत. हा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

You might also like