‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बिग बींचा कौन बनेगा करोडपती ?

योग्य ती खबरदारी घेत या मालिकांचं चित्रिकरण सुरु झालं. दरम्यान, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन ह्यांनीसुध्दा करोनामुक्त झाल्यानंतर पुनश्च हरिओम म्हणत आपल्या कामाचा श्रीगणेशा केला. अनेकदा ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवरुन ते विविध फोटो सोशल मिडीयावर चाहत्यांसोबत शेअर करतात. त्यामुळेच केबीसी १२ चा सीझन कधी टीव्हीवर पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती.
बिग बींचा केबीसी हा पॉप्युलर क्वीझ रिएलिटी शो येत्या 28 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्यासाठी मेकर्सनी सर्व तयारी सुरु केली आहे. पण महत्त्वाचं म्हणजे हा शो अनेक बदल करुन नव्या ढंगात प्रेक्षकांसमोर येईल.
लॉकडाऊन काळ अद्याप सुरु असल्याने ह्यात साहजिकच लाईव्ह ऑडिएन्स नसतील आणि मुख्य म्हणजे त्यामुळेच स्पर्धकांना ऑडिएन्स पोल हा पर्याय निवडता येणार नाही.काही दिवसांपूर्वीच बिग बींनी हा शिल्ड घातलेला फोटो शेअर करत चाहत्यांना सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं होतं. बिग बींच्या सोशल मिडीया पोस्टची चाहत्यांना खुप उत्सुकता असते.