कतरिना मुळे थांबले ‘भारत’ चित्रपटाचे शूटिंग, ‘हे’ आहे कारण……

‘भारत’ या चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरु असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र चित्रपटाच्या सेटवर कतरिना कैफ जखमी झाल्यामुळे चित्रिकरणमध्येच थांबलं आहे. एक अॅक्शन सीन शूट करत असताना कतरिनाच्या पायाला जबर दुखापत झाली आहे.

या दुखापतीमुळे डॉक्टरांनी तिला विश्रांती घेण्यास सांगितलं आहे. त्यामुळे काही काळ चित्रिकरण थांबविण्यात आलं आहे.

दरम्यान, काही दिवसापूर्वीच भारतचा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये सलमानचे विविध रुपे पाहायला मिळाली. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेतही रिलीज होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like