अक्षय कुमारच्या घरात येणाऱ्या दुधाची किंमत ऐकून बसेल शॉक

बॉलीवूड स्टार्स कडे पैशांची कोणतीही कमी नाहीये. आपणा सर्वांना माहितीच असेल अक्षय कुमार हेल्थ साठी किती जागरूक आहे. त्याचा दिवस पहाटे ४ वाजता सुरु होतो आणि शेवटचे जेवण संध्याकाळी ७ च्या आत घेतो. रात्री जर भूक लागलीच तर ऑम्लेट बनवून खातो जे पचण्यासाठी चांगले असते. त्याच्या घरी येणारं दूध ही खूप महाग आहे.

अक्षय कुमार च्या घरी येणाऱ्या दुधाची किंमत १९० रुपये लिटर आहे. दूध गायीचे असते पण त्या गाईंना खाण्यासाठी खास आहार दिला जातो ज्यामुळे ह्या गायी पौष्टिक दूध देतात. ह्या गायींच्या दुधात कॅल्शिअम आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. कॅल्शिअम हाडांच्या आणि दातांच्या विकासासाठी आवश्यक असते तसेच मसल बिल्डींग मधेही ह्याचा उपयोग होतो.

हे दूध केवळ वीआयपी लोकांनाच दिले जाते. इतर नागरिकांसाठी हे दूध उपलब्ध नाही. गायीचं दूध काढण्यासाठी मशीनचा वापर केला जातो. हे दूध नैसर्गिक रीत्याच फ्रेश असते. ह्या गाईंना शुद्ध आरओचे पाणी प्यायला दिले जाते आणि त्यांची राहण्याची जागा सुद्धा खूप स्वच्छ असते.

उन्हाळ्यामध्ये ह्या गाईंसाठी खास AC ची व्यवस्था केली जाते. गायींच्या आरोग्याची चाचणी नियमितपणे केली जाते आणि गाय जर आजारी असेल तर तिचं दूध पाठवलं जात नाही. आपल्याकडे येणाऱ्या पॅकेज्ड दुधामध्ये प्रेजर्वेटिव्हस असतात त्यामुळे दूध लवकर खराब होत नाही.दर दिवसाला लाखोंची कमाई करणाऱ्या अक्षय कुमार साठी १९० रुपये काहीच किंमत नसली तरी सर्वसामान्यांसाठी ही किंमत न परवडणारीच आहे.

दरम्यान, आजकाल सर्वच लोकं हेल्थ कॉन्शस झाली आहेत. इंटरनेट माधुयमातून भरपूर लोक स्वतः माहिती गोळा करून त्याप्रमाणे आपला आहार आणि व्यायाम निवडतात. कमी बजेट मध्ये पौष्टिक आहार त्यांना मिळतो. त्यामध्ये दूध, अंडी, शेंगदाणे, चणे, व्हे प्रोटीन ह्यांचा समावेश ते आपल्या आहारात करतात.

You might also like