शिवानी सुर्वेला वाटते ‘या’ गोष्टीची भीती

शिवानी सुर्वे ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर पडली होती. आता घरात ती परतली आहे. ‘वूट’च्या ‘अनसीन अनदेखा’च्या नुकत्याच एका क्लिपमध्‍ये शिवानीला अंधाराची आणि भूतांची भीती वाटत असल्‍याचं सांगताना दिसतेय.

”तुला एकटं राहावं लागलं तर तू राहू शकतेस का?” असा प्रश्न शिवानीला विचारला तेव्हा ती म्‍हणाली, ”मी एकटी राहूच शकत नाही, कधीच नाही. मी एक दिवस पण एकटी राहिली नाही.” शिवानी पुढे म्‍हणाली, ”मला भूतांची भीती वाटते. कोणीतरी येणार अशी सतत भीती मला वाटते. नशीब मी भूताच्या टास्‍कवेळी घरात नव्‍हते. हे सगळं निरर्थक आहे हे मला माहित आहे. पण वाटते मला भीती.”