रसिक-प्रेक्षकांची लाडकी शीतली आली रं.. मात्र एका वेगळ्या भूमिकेत

‘लागिरं झालं जी’ या मालिकेने महिन्याभरापूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिका जरी संपली असली तरी देखील या व्यक्तिरेखांचा उल्लेख मात्र प्रेक्षक आवर्जून करतात. जर रसिक-प्रेक्षक त्यांच्या लाडक्या शीतलीला मिस करत असतील तर त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. शीतल अर्थात शिवानी बावकर पुन्हा एकदा एका नव्या मालिकेत दिसणार आहे.
आगामी आलटी पालटी या मालिकेत शिवानी मुख्य भूमिकेत चमकणार असून यात ती एक ठग म्हणून दिसेल. मालिका आणि मालिकेतील इतर कलाकारांबद्दलची माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. लवकरच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस येईल.