शिवानी बावकर-पूर्णिमा डे लवकरच दिसणार एका चित्रपटात

शिवानी बावकर आणि पूर्णिमा डे या दोघी लवकरच एकत्र चित्रपटात झळकणार आहेत. ‘मिरॅकल्स फिल्म्स’ प्रस्तुत ‘युथट्यूब’ या आगामी मराठी चित्रपटातून आपल्याला त्यांच्या मैत्रीचा अनोखा अंदाज बघायला मिळणार आहे.
तरुणाईची बदलती जीवनशैली, सोशल मिडियाच्या आहारी गेल्याने हरवत चाललेला संवाद या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन सात तरुण तरुणींची कथा ‘युथट्यूब’ या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रमोद प्रभुलकर यांनी केले आहे .या चित्रपटात ३०० नवीन चेहरे झळकणार आहेत.१ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्वाच्या बातम्या –