12 वर्षांनंतर शिल्पा शेट्टी झळकणार ‘या’ चित्रपटात ?

दिलजीत दोसांज आणि यामी गौतम एक नवा कॉमेडी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असे म्हटले जात आहे.  चित्रपटाची घोषणा करताना रमेश तौरानी यांनी आणखी एक कलाकार महत्वाची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले आहे. परंतु या चित्रपटाचे नाव आद्याप समोर आलेले नाही.

आता या चित्रपटात शिल्पा शेट्टीची निवड करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजीज मिर्जा यांचा मुलगा दिग्दर्शित करणार  आहे. तसेच या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे.

शिल्पा शेट्टीने २००७मध्ये ‘अपने’ चित्रपटात काम केले होते. शिल्पा तिच्या आगामी चित्रपटात एका लेखिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाबाबत शिल्पा फार उत्साही असल्याचे दिसत आहे.

You might also like