गणपती विसर्जन करताना शिल्पा शेट्टीने केला डान्स

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी शनिवारी गणपती बाप्पाचे आगमन झाले होते. दीड दिवसांच्या पाहुणचारानंतर शिल्पाने गणपती बाप्पाचे विर्सजन केले. शिल्पाने पती राज कुंद्रा आणि मुलासोबत घरच्या घरी गणपतीचे विसर्जन केले आहे. दरम्यान तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ती डान्स करताना दिसत आहे.

गणपती विसर्जनासाठी शिल्पाने पारंपरिक कपडे परिधान केले होते. तिचा हा लुक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. तिने पिवळ्या आणि क्रीम रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. सध्या तिचे हे गणपती विसर्जनाचे व्हिडीओ चर्चेत आहेत.

गणपती विसर्जन झाल्यानंतर शिल्पाने तेथे उपस्थित असणाऱ्या फोटोग्राफर्सला बाप्पाचा प्रसाद देखील दिला आहे. व्हिडीओमध्ये शिल्पा दोन डिशमध्ये प्रसाद आणते आणि फोटोग्राफर्सला देताना दिसते.

 

You might also like