चाहत्यांच्या भेटीला लवकरच येणार शेवंता; सोशल मिडीयाद्वारे दिली माहिती

अनलॉक १ मध्ये  आता हळूहळू मालिका आणि चित्रपटांच्या शूटींगचा श्रीगणेशा होत आहे. छोट्या पडद्यावरची कोकणच्या पार्श्वभूमीवर घडणारी सर्वात लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चाले २ चं शूटींग लवकरच सुरु होत आहे. मालिकेत शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने याबाबत सोशल मिडीयाद्वारे माहिती दिलीय.

अपूर्वा म्हणते, माझे पायजमावाले दिवस संपले. आता वेळ आली आहे, कामावर परतण्याची…शेवंता तुला मी लवकरच भेटेन….असं म्हणत शेवंताने , तुम्ही उत्सुक आहात की नाही तिला भेटायला असा सवालही केला आहे. अपूर्वा सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते, तिेन दिलेल्या या बातमीनंतर चाहत्यांनी कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

 

You might also like