बिग बींच्या ‘त्या’ ट्विटवर शेखर सुमनची प्रतिक्रिया

सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळावा यासाठी त्याचे कुटुंबीय, चाहते आणि कलाविश्वातील काही सेलिब्रिटी मंडळी सातत्याने प्रयत्न करत आहेत. यामधीलच एक नाव म्हणजे  शेखर सुमन. सुशांतला न्याय मिळावा यासाठी शेखर सुमन अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहेत.

यामध्येच अमिताभ बच्चन यांनी जगातील सर्वाधिक तीव्र ध्वनी कोणता याविषयी एक ट्विट केलं होतं. त्यावर शेखर सुमन यांनी प्रतिक्रिया देत जगातला सगळ्यात तीव्र ध्वनी सुशांतच्या चाहत्यांचा असल्याचं म्हटलं आहे.

“नोंद करण्यात आलेल्या जगातल्या सगळ्यात तीव्र ध्वनीमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांचा आवाज आहे. सुशांतला न्याय मिळावा म्हणून त्यांचा आवाज इतका तीव्र आहे की त्यातून निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरी जगाच्या असंख्या फेऱ्या मारुन येतील आणि अजूनही त्या फेऱ्या सुरु आहेत”, असं रिट्विट शेखर सुमन यांनी केलं आहे.

आतापर्यंत नोंदविण्यात आलेल्या जगातील सर्वात तीव्र ध्वनी हा ३ हजार मैलांपर्यंत ऐकू गेला होता. हा ध्वनी इतका मोठा होता की त्यातून निघालेल्या ध्वनीलहरींनी जगाला चक्क ३ फेऱ्या मारल्या होत्या. हा तीव्र ध्वनी क्रेकोटा या ज्वालामुखीतून निघाला होता. २७ ऑगस्ट रोजी हा पर्वत तुटला आणि त्यातून ३१० डेसिबलचा आवाज आला होता असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले होते.

You might also like