‘शीतली’ येतेय पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटायला; ‘या’ नव्या मालिकेतून

काही दिवसांपूर्वी लागीरं झालं जी ही मालिका संपली. त्या वेळी टीआरपी रेटिंगमध्ये संपता संपता ही मालिका नंबर वन झाली होती. अज्या आणि शीतलीचे फॅन्सही खूप होते. आता तिच्या फॅन्ससाठी खूशखबर आहे. तुम्ही शीतलीला मिस करत असाल, तर ती परत येतेय. हो, शिवानी बावकर पुन्हा एकदा एका नव्या मालिकेत दिसणार आहे. झी मराठीवरील आगामी आलटी पालटी या मालिकेत शिवानी मुख्य भूमिकेत आहे. यात ती एक ठग म्हणून दिसेल

शिवानी म्हणते की,  ‘मला अभिनय करायचा आहे मग तो टीव्ही असो किंवा इतर कुठलंही माध्यम. शीतलच्या भूमिकेने मला काम करण्याचं समाधान दिलं आणि प्रसिद्धी मिळवून दिली. आता मी जी भूमिका स्वीकारली आहे ती शीतलच्या अगदी विरुद्ध आहे. शूटिंगच्या वेळी मला फार त्रास होत नाही. हा सगळा माहोल आणि काम आवडतंय म्हणूनच मी हे करतेय.’