हा फोटो शेअर करुन माझा आजार दाखवत नाहीये, तर आजाराशी लढण्याची इच्छाशक्ती दाखवत आहे

आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप सध्या कॅन्सरशी लढा देत आहे. ताहिराला गेल्या वर्षी कॅन्सर असल्याचे निदान झालं होतं. त्यामुळे तिच्यावर किमोथेरपीही करण्यात आली होती. या थेरपीमुळे तिला तिचे केसही गमवावे लागले होते.
जागतिक कॅन्सर दिनानिमित्ततिने ताहिराने आपला एक बॅकलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून आपल्या सर्जरीची जखम दाखविली आहे. हा फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे. ताहिराची ही पोस्ट आयुष्माननेही शेअर केली आहे.
‘आज मी हा फोटो शेअर करुन माझा आजार दाखवत नाहीये, तर या आजाराशी लढण्याची माझी इच्छाशक्ती दाखवत आहे. मी या आजाराचा आणि या जखमांचा आदरपूर्वक स्वीकार केला आहे. जगात परफेक्ट असं काहीच नाही. त्यामुळे तुम्ही जसे आहात तसंच स्वत:ला स्वीकारा’, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या –