बिग बी वडिलांच्या आठवणीत व्याकुळ, शेअर केली कविता

कोरोना विषाणूने साऱ्या जगात धुमाकुळ घातल्यानंतर आता कलाकारांच्या घरातही शिरकाव केला आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना कोरोनाची बाधा झाली आहे व त्या नंतर अभिषेक बच्चन यांची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन हिला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.
सध्या बिग बी मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयातही ते सोशल मीडियावर सक्रिय आहेत. आपल्या आरोग्याबाबतची माहिती देत आहेत आणि विशेष म्हणजे आपल्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचेही सातत्याने आभार मानत आहेत.
दरम्यान, नुकतंच अमिताभ यांनी आपले वडील ‘हरिवंश राय बच्चन’ यांची एक कविता शेअर केली आहे. याबद्दल त्यांनी म्हटलं कि, ‘बाबूजींनी जी माणसं न थकता काम करत असतात, जे लोक कोणत्याही स्वार्थाशिवाय पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्यावर ही कविता लिहिली आहे. या कवितेसोबत बच्चन यांनी एक फोटो ही शेअर केला आहे.
मैं हूँ उनके साथ, खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़।कभी नहीं जो तज सकते हैंअपना न्यायोचित अधिकार,कभी नहीं जो सह सकते हैंशीश नवाकर अत्याचार,एक अकेले हों या उनकेसाथ खड़ी होभारी भीड़;मैं हूँ उनके साथ, खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़। अशी कविता त्यांनी शेअर केली आहे.
अमिताभ बच्चन सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत जोडलेले आहेत. ते आपल्या आरोग्याबाबत माहिती देण्यासह फॅन्सनी केलेल्या प्रार्थनेसाठी धन्यवाद व्यक्त करीत आहेत.