शमिता शेट्टीच्या गाडीला अपघात; ड्रायव्हरलाही मारहाण

शमिता शेट्टीसोबत गैरवर्तवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री तीन अज्ञात व्यक्तींनी शमिताच्या गाडीला मोटारसायकलने धडक दिली.या अपघातातून शमिता बचावली असून तिच्या ड्रायव्हरला मारहाणही केल्याची घटना उघडकीस आली आहे.
ठाण्यातील व्हिवियाना मॉलजवळ हा अपघात झाला असून शमिता शेट्टीच्या ड्रायव्हरने राबोडी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ड्रायव्हरने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याप्रमाणेच पुढील तपास सुरु झाला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- पुन्हा प्रेक्षकांना हसवायला एकत्र येणार बाबूभाई, श्याम आणि राजू
- ‘दोस्ताना २’ मध्ये ‘या’ अभिनेत्रीची वर्णी?
- सोनमने शेअर केले ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’चे मोठे ‘सिक्रेट’
- टीव्ही अभिनेता राहुल दीक्षितची गळफास घेऊन आत्महत्या