अक्षय आणि मी एकत्र काम करणं फार अशक्य आहे

शाहरुख खान आणि अक्षय कुमार ही नावाजलेली नावं आहेत. या दोघांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले असून त्यांनी बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली आहे. मात्र या दोघांना फार कमी वेळा एकत्र पाहायला मिळालं आहे. त्यामुळे या दोघांनी एकत्र स्क्रीन शेअर करावी अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. मात्र शाहरुखने अक्षयसोबत स्क्रीन शेअर करण्यास नकार दिला आहे.

अक्षय व तू कधीच एकत्र काम का केले नाही? असा प्रश्न शाहरुखला एका ताज्या मुलाखतीत विचारण्यात आला. यावर शाहरुखने बरेच मजेशीर उत्तर दिले. अक्षयसोबत मी कधीच का काम केले नाही, या प्रश्नावर मी काय बोलू? याचे कारण एकच आहे. ते म्हणजे, मी त्याच्यासारखा पहाटे उठू शकत नाही. त्याच्या दिवसाची सुरुवात होते, तेव्हा मी झोपायला जातो. तो पॅकअ‍ॅप करतो, त्यावेळी माझे काम सुरु होते. अनेक लोक माझ्यासारखे रात्री काम करत नाहीत, हे मला ठाऊक आहे. कदाचित त्यामुळेच माझ्यापेक्षा अक्षय कामाला अधिक वेळ देऊ शकतो. मला अक्षयसोबत काम करायला आवडेल. पण समजा मी असा एखादा चित्रपट साईन केलाच तर तो सेटवरून निघण्याच्या तयारीत असेल आणि येण्याच्या, असाच एक सीन आमच्यावर शूट होऊ शकतो. आमचे टायमिंगचं असे आहे,असे शाहरुख म्हणाला.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like