शाहरूख खानने नाकारली करणची ‘कॉफी’….!

करण जोहरचा ‘कॉफी विद करण’च्या या सीझनमध्ये बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी हजेरी लावली. पण बॉलिवूडच्या एका सुपरस्टारने म्हणे, करणची कॉफी पिण्यास नकार दिला आहे. हा सुपरस्टार कोण, तर शाहरूख खान आहे.

डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या यंदाच्या सीझनमध्ये शाहरूखने यावे, अशी करणची मनापासून इच्छा आहे. करणने अनेकदा शाहरूखला शोमध्ये येण्याची विनंती केली. पण शाहरूख मात्र मानायला तयार नाही. याचे कारण काय आहे शाहरूखचे करिअर.

सध्या शाहरूखचे करिअर ब-याच वाईट फेजमधून जातेय. त्याचे अलीकडचे सगळेच चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटले. त्यामुळे करणच्या शोमध्ये जावून बोलायचे काय, असा प्रश्न शाहरुखला पडलाय आणि याचमुळे तो या शोवर जाण्यास टाळाटाळ करताना दिसतोय.

महत्वाच्या बातम्या –

You might also like