‘या’ कारणामुळे शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक

सध्या अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिकची चर्चा सुरु आहे. या चित्रपटासाठी आमिर खानच्या नावाचीही चर्चा झाली होती. मात्र आमिरने या चित्रपटासाठी शाहरुख खानचं नाव चित्रपट दिग्दर्शकांना सुचविलं होतं. त्यामुळे आमिरऐवजी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचं नाव जवळजवळ निश्चित झालं होतं. मात्र आता शाहरुखने अचानकपणे या चित्रपटासाठी नकार दिल्याचं समोर आलं आहे.

शाहरुखच्या या निर्णयामुळे कलाविश्वामध्ये जोरदार चर्चा सुरु झाली असून शाहरुखने त्याच्या आगामी चित्रपटासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.फरहान अख्तरचा आगामी ‘डॉन ३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेमध्ये झळकणार आहे. त्यामुळेच शाहरुखने राकेश शर्माच्या बायपोकिसाठी नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे.

राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची निर्मिती ‘आरकेएफ प्रोडक्शन’ करणार आहे. हा चित्रपट २०१९मध्ये प्रदर्शित होणार असून या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीसाठी प्रियांका चोप्रा, भूमी पेडणेकर आणि फातिमा सना शेख या तिघींच्या नावाचीही चर्चा सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like