ट्रोलर्सला सुहानाचं सडेतोड उत्तर

शाहरुख खानची लेक सुहाना खान ही बऱ्याच वेळा सोशल मीडियावर चर्चेत असते. मात्र, यावेळी सुहाना तिच्या रंगावरुन ट्रोल झाली आहे. काही नेटकऱ्यांनी तिला रंगावरुन ट्रोल केलं आहे. विशेष म्हणजे या ट्रोलर्सला सुहानाने सडेतोड उत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे.
सुहानाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र, सुहानाने या ट्रोलर्सला उत्तर दिलं असून तिचं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सध्या बऱ्याच गोष्टी घडताना दिसत आहेत आणि त्यातल्याच एका गोष्टीवर व्यक्त होण्याची, ती गोष्ट सुधारण्याची आपल्याला गरज आहे. हे फक्त माझ्याच बाबतीत नाहीये. तर माझ्यासारख्याच अनेक मुला-मुलींच्या बाबतीत घडतं ज्यांना कोणत्याही कारणाशिवाय उगाच अवहेलना सहन करावी लागते. मी १२ वर्षांची असताना मला सांगण्यात आलं होतं. तुझ्या रंगामुळे तू कुरुप दिसतेस.
विशेष म्हणजे ही टीका आपलेच लोक करतात. मुळात आपण सगळेच भारतीय कृष्णवर्णीय आहोत. तुम्ही तुमच्या रंगापासून कितीही वेगळं होण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य नाहीये. आपल्याच लोकांच्या डोळ्यात तिरस्काराचे भाव पाहणं हे खरंच अत्यंत त्रासदायक आहे. सोशल मीडियावरील इंडियन मॅचमेकिंगच्या चर्चा पाहून किंवा तुमच्या कुटुंबानेच तुम्हाला सांगितलं असेल की तुम्ही ५.७ आहात आणि तुमचा रंग गोरा नाहीये म्हणजे तुम्ही सुंदर नाही, हे ऐकलं की खरंच मला फार वाईट वाटतं. हो. मी आहे, ५.३ आणि माझा रंग सावळा आहे. पण तरीदेखील मी आनंदी आहे आणि तुम्हालादेखील आनंदी राहता आलं पाहिजे”असं सुहाना म्हणाली.