कबीर सिंगने ‘या’ चित्रपटांचा रेकॉर्ड मोडत केले इतक्या कोटींचे कलेक्शन

शाहिद कपूरचा सिनेमा कबीर सिंगने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आजही या सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील घौडदौड कायम आहे. शाहिद कपूरच्या करिअरमध्ये इतकी कमाई करणार हा पहिला सिनेमा ठरला आहे.

आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जगभरात ३५० कोटी रुपये कमावले आहेत. केवळ २५ दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस इंडिया या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, कबीर सिंग हा या वर्षातील जगभरात सगळ्यात जास्त कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे.

या वर्षांत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये विकी कौशलच्या ऊरीः द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाने जगभरात ३३८ करोडचा तर सलमान खानच्या भारत या चित्रपटाने ३०४ करोडचा गल्ला जमवला होता. कबीर सिंग या चित्रपटाने आता या सगळ्याच चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.

You might also like