शाहिदने सलमान खान व अक्षय कुमार या दिग्गजांनाही टाकलं मागे

‘कबीर सिंग’ची बॉक्स ऑफीसवर यशस्वी घोडदौड सुरूच आहे. अर्जुन रेड्डीने बॉक्स ऑफीसवर जितकी कमाई केली होती, त्याहून अधिक कमाई ‘कबीर सिंग’ने अवघ्या तीन दिवसांत केली.

शाहिद कपूर, कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने आणखी एक विक्रम केला आहे. २०१९ या वर्षातील प्रदर्शनाच्या दुसऱ्या शुक्रवारी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट आहे. याबाबतीत शाहिदने सलमान खान व अक्षय कुमार या दिग्गजांनाही मागे टाकलं आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, ‘कबीर सिंग’ने दुसऱ्या शुक्रवारी १२.२१ कोटींची कमाई केली आहे. यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर विकी कौशलचा ‘उरी’ हा चित्रपट आहे. तर अक्षयचा ‘केसरी’ चौथ्या क्रमांकावर व सलमान खानचा ‘भारत’ पाचव्या क्रमाकांवर आहे.

 

You might also like