अभिनेता शाहरूख खान ‘डॉक्टरेट’

हैदराबाद:  मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाने शाहरूखला डॉक्टरेट ही मानद पदवी देऊन गौरविले आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पदवी प्रदान करून शाहरूखला सन्मानीत करण्यात आले आहे.

हैदराबादेतील मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठानं काही दिवसांपूर्वीच शाहरुखला डॉक्टरेट जाहीर केली होती. दरम्यान, मौलाना आझाद नॅशनल उर्दू विद्यापीठाचा 6 वा दिक्षांत समारंभ हैदराबादच्या गाचीबोवली परिसरातील कॅम्पसमध्ये नुकताच पार पडला. या समारंभात शाहरूखला डॉक्टरेट पदवीने सन्मानीत करण्यात आले. या समारंभाला प्रत्यक्ष हजेरी लावत शाहरूखने हा सन्मान स्विकारला. या वेळी त्याचे चाहतेही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हा सन्मान स्विकारल्यावर शाहरुख म्हणाला, ‘मला हा सन्मान प्राप्त झाल्यामुळे मी फार खूश आहे. मला हैदराबादेतून पुरस्कारानं सन्मानित करण्यात आल्यामुळे माझी आजी खूप आनंदीत असेल. हैदराबाद हे माझ्या आईचं जन्मस्थळ आहे’. या वेळी शाहरूखने सर्वांचे आभार मानले..

You might also like