कोरिओग्राफर सलमान खानविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप

प्रसिद्ध कोरिओग्राफर सलमान खान याच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात एका महिलेने ३० जानेवारी रोजी ही तक्रार दाखल केली आहे.

तक्रारकर्ता महिला ही डान्सर असून सलमान आणि त्याच्या भावावर तिने आरोप केले आहेत. दुबईत डान्स शो करण्याची ऑफर देण्यासाठी सलमानने संबंधित महिलेला भेटण्यासाठी बोलावले होते. त्यावेी त्याने गैरवर्तन केलं. इंडस्ट्रीत अशा गोष्टी होत असतात असं सलमान म्हणाल्याचं महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर दुबईतील डान्स शोचं काम दिल्यानंतर सलमान आणि त्याच्या भावाने मिळून बेहरिन इथं गैरवर्तन केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलीस करत आहेत.

महत्वाच्या बातम्या –