‘ABCD 3’ची शूटिंग करताना वरुनच्या पायाला गंभीर दुखापत

वरुन धवन सध्या ‘ABCD 3’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. नुकताच वरुनने त्याचे पंजाबचे शूटिंग संपवले असून शूटिंगच्या वेळेस त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्याच्या गुडघ्यांना गंभीर इजा झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. ८ फेब्रुवारी रोजी त्याच्या लंडन शूटिंगचा प्रारंभ होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार गाण्याच्या शूटिंगमध्ये त्याचा गुडघा जोरात जमीनीवर आपटल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. सध्या वरुन मुंबईत परतला असून दुखापतीवर उपचार घेत असून वरुन लवकरात लवकर दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे.
महत्वाच्या बातम्या –
- कोरिओग्राफर सलमान खानविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप
- निर्णय कळवला नाहीतर मला दिशाला रिप्लेस करावे लागेल – असित कुमार मोदी
- अखेर सलमान खान आणि कॅटरिना कैफचे होणार लग्न…!
- ‘८३’चित्रपटा मध्ये साहिल खट्टरची वर्णी, साकारणार ‘या’ क्रिकेटरची भूमिका