नाईकांचा वाडा पाहून शेवंता म्हणते, ‘हा केवळ वाडा नाहीये तर…..’

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या दुस-या पर्वाचं शुटिंग लॉकडाऊननंतर पुन्हा सुरु झालं आहे. लॉकडाऊनमुळे वाड्यापासून लांब असलेले कलाकार आता पुन्हा एकदा वाड्याकडे परतले आहे. शेवंता साकारत असलेली अपुर्वा नेमळेकरने या वाड्याचा फोटोही शेअर केला आहे. शेवंताने या वाड्याचा फोटो पोस्ट केला आहे.
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, ‘हा केवळ वाडा नाही तर भावना आहे’.या मालिकेतील नवे भाग चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. सावंतवाडीच्या आधी कुडाळजवळ आकेरी गावात हा वाडा आहे. शेटकर या वाड्याचे मालक आहेत. रात्रीस खेळ चालेमुळे या वाड्याला चांगली प्रसिद्धी मिळाली. आता हा वाडा टुरिस्ट स्पॉट बनला आहे.
दरम्यान,‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या दुस-या पर्वाचं शुटिंग लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा सुरु झालं आहे. लॉकडाऊनमुळे वाड्यापासून लांब असलेले कलाकार आता पुन्हा एकदा वाड्याकडे परतले आहे.मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या दुसऱ्या भागावरदेखील प्रेमाचा वर्षाव करत आहेत. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. अण्णा नाईकांशी लग्न करून शेवंता नाईक वाड्यात प्रवेश करणार आहे.
या मालिकेत अपूर्वा नेमळेकर शेवंताची भूमिका साकारत असून माधव अभ्यंकर हे अण्णांची भूमिका साकारत आहे. मालिकेतील कलाकारांनाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.गूढ आणि थरारपूर्ण कथानक असलेल्या या मालिकेची प्रेक्षकांमध्ये आता आणखी उत्सुकता वाढली आहे.